कै. पांडुरग वामन काणे / भारतरत्न, महामहोपाध्याय |
कै. पांडुरग वामन काणे यांचा जन्म ७ मे १८८० रोजी पेढेस किंवा परशुराम या आपल्या मामांच्या गावी झाला. काणे हे एकूण ९ भावंडांपैकी दुसरे व मुलांमध्ये सर्वांत मोठे अपत्यं होते. त्यांचे वडील वामनराव हे काणे यांच्या मुळे गावी मुरडे येथे मुक्काम होते. वामनरावांनी ऋग्वेदाचे प्रदीर्घ अभ्यास करून भिक्षुकीचा व्यवसाय स्वीकारला होता.
कै. विद्यारत्न डॉ.सिद्धनाथ कृष्णाजी काणे / प्रखर राष्ट्रभक्त व क्रांतिकारक |
कै. अॅडव्होकेट वासुदेव सीताराम काणे / एक सच्चा मानवतावादी |
मानवतावादी कुटुंबातील सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे, गाजावाजा न करता त्यांच्यातील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करणारे व मानवतावादी विचार रुजविण्यासाठी नवनवीन योजना आखून त्या स्वखर्चाने अंमलात आणणारे कै. व. सि. काणे यांचा जन्म कोकणातील खेड तालुक्यातील मुरुडे ह्या छोट्या गावी १७ जुलै १९१४ रोजी झाला.
कै. संगीताचार्य पंडित दत्तात्रय विष्णू काणे / एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व |
पं दत्तात्रय विष्णू काणे ह्यांचा जन्म वडील विष्णू बळवंत व आई काशीताई यांचे पोटी मार्च १९२१ मध्ये झाला. विष्णूपंतांचे डोळे लहानपणीच गेल्यामुळे त्यांना अंधत्व आले होते. तथापी ते हार्मोनियम, सतार, तबला वगैरे वाद्ये उत्तम प्रकारे वाजवीत. इचलकरंजी अधिपती श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे यांचे दरबारी ते वादक म्हणून काम करीत असत, त्यामुळे लहानपणापासूनच काणेबुवांना घरीच संगीताचे बाळकडू मिळाले.
कै. श्रीपाद प्रभाकर काणे तथा काणे काका / परमचैतन्य श्री काणे महाराज |
काणे काकांचा जन्म पौष वद्य पंचमी, शके १८१८, शनिवार, दि. २३ जानेवारी, १८९७ रोजी हेरे संस्थानात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रभाकर होते. काणे ह्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळ्याजवळील निवेंडी. तेथून काणे ह्यांचे पूर्वज केसपुरी येथे आले. पेशवेकाळांत श्री. काणेकाका यांचे पूर्वज धामापूरला होते व त्यांना महाजन हा अधिकार होता.
कै. नारायण विष्णू तथा मामा काणे (मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह ह्या संस्थेचे संस्थापक) |
जन्म : २८ फेब्रुवारी, १८८५
मृत्यू : ७ जुलै, १९४२
शतकोत्तर वाटचाल चालू असलेल्या,‘दादरच्या मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह’ ह्या संस्थेचे संस्थापक कै. नारायण विष्णू काणे यांचा जन्म २८ डिसेंबर, १८८५ रोजी त्यांचे मूळ गाव रीळ –केसपुरी येथे झाला. स्वतंत्र उद्योग करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते लहानपणीच पेणला येऊन राहिले.
कै. डॉ. दत्तात्रय गोपाळ तथा तात्यासाहेब काणे |
संपूर्ण नंदूरबार गावाला एक प्रेमळ, दानशूर व कनवाळू व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेल्या डॉ. द. गो. तथा तात्यासाहेब काणे ह्यांचा जन्म २३ सेप्टेंबर, १८९९ रोजी वेल्लूर येथे झाला. आईवडिलांचे लवकर निधन झाल्यामुळे त्यांच्या काकांनी त्यांचा सांभाळ करून त्यांना मेडिकलचे शिक्षण दिले. डॉक्टर झाल्यावर त्यांनी काही काळ एडन येथे बोटीवर नोकरी केली.
कै. शंकर दिनकर तथा भैय्याजी काणे / पुर्वांचलांतील विद्यार्थींचे ओजा (गुरु) |
पुर्वांचलांतील विद्यार्थींचे ओजा (गुरु) म्हणून ओळखले जाणारे, शंकर दिनकर तथा भैय्याजी काणे यांचा जन्म ६ डिसेंबर, १९२४ रोजी नाशिक येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांचे नाव राधाबाई व दिनकर बलवंत काणे असे होते. हे काणे घराणे मूळचे वरवडे येथील होते. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरी निमित्ताने नाशिक, पुणे,सातारा तेथे त्यांचे वास्तव्य होते. पाच भाऊ व एक बहीण या भावंडांत भैय्याजी चवथे होते.
कै. डॉ. मधुसूदन सिद्धनाथ काणे / गरिबांचे मासिहा |
डॉ. मधुसूदन सिद्धनाथ काणे ह्यांचा जन्म १६ जुलै १९२३ रोजी यवतमाळ येथे झाला. प्रख्यात क्रांतिकारक डॉ. सिद्धनाथ कृष्णाजी काणे हे त्यांचे वडील ! त्यांचे बालपण अतिशय संपन्नतेते व्यतीत झाले. पण त्यानंतर त्यांचे वडील व काका समाजकारणात उतरले, पण त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊन बिकट व आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागले.
डॉ. मधुसूदन दत्तात्रय काणे |
डॉ. अनिल श्रीधर काणे अध्यक्ष, काणे कुलप्रतिष्ठान |
१०२ हून अधिक देशांतील ५०० पेक्षा अधिक सदस्य असलेल्या वर्ल्ड विंड एनर्जी असोशियेशनच्या २००५ साली मेलबोनंमध्ये झालेल्या जनरल असेंम्ब्लीमध्ये एकमताने प्रेसिडेंट म्हणून निवड झालेल्या व त्यानंतर सातत्याने ३ वेळा या पदावर निवडले गेलेल्या. डॉ.अनिल श्रीधर काणे ह्यांचा जन्म १८ ऑक्टोबर, १९४१ रोजी भावनगर येथे झाला.
वेलु गेला गगनावरी सॉलिसिटर हिमांशू वासुदेव काणे |
कै. वा. सि. काणे या प्रख्यात वकिलांच्या घराण्यात हिमांशु वासुदेव काणे यांचा जन्म पुणे येथे १७ जुलै, १९५० रोजी झाला. नशिक येथील ‘भोसला मिलिटरी स्कूल’ येथून त्यांनी मिलिटरी सायन्स’ या खास विषयात आपले शालेय शिक्षण पूर्ण केले पुढे रुपारेल कॉलेजमधून B.Sc. व गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून L.L.B. अशा दोन्ही पदव्या प्रथम श्रेणीमध्ये प्राप्त केल्या. त्यानंतर Bombay Incorporated Law Society च्या Solicitor परीक्षेत ‘प्रथम क्रमांक’ मिळवून सुवर्णपदकाचे मानकरी झाले.
ह.भ.प. नारायण श्रीपाद काणे – कीर्तनकार (गणेशवाडीकार) |
पाच पिढ्यांची कीर्तनकारांची परंपरा असलेल्या गणेशवाडीच्या काणे घराण्यात नारायण श्रीपाद काणे यांचा जन्म १२ जानेवारी १९३९ ला झाला. त्यांचे पूर्वज श्री भिकंभट हे केसपुरीहून कुरुंदवाड संस्थांनचे संस्थानिक राजे पटवर्धन यांच्या गणेशवाडी येथीस श्री गजानन मंदिराच्या व्यवस्थेसाठी सुमारे २५० वर्षांपूर्वी आले व त्यानंतरच्या पिढ्या तेथेच स्थायिक झाल्या.
श्री सुहास अनंत काणे |
दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त श्री. संजय बळवंत उर्फ भाऊ काणे |