डॉ. अनिल श्रीधर काणे अध्यक्ष, काणे कुलप्रतिष्ठान

१०२ हून अधिक देशांतील ५०० पेक्षा अधिक सदस्य असलेल्या वर्ल्ड विंड एनर्जी असोशियेशनच्या २००५ साली मेलबोनंमध्ये झालेल्या जनरल असेंम्ब्लीमध्ये एकमताने प्रेसिडेंट म्हणून निवड झालेल्या व त्यानंतर सातत्याने ३ वेळा या पदावर निवडले गेलेल्या. डॉ.अनिल श्रीधर काणे ह्यांचा जन्म १८ ऑक्टोबर, १९४१ रोजी भावनगर येथे झाला. मूळच्या केसपुरीच्या असलेल्या काणे घराण्याचे गेल्या चार पिढ्यांपासून भावनगर येथे वास्तव्य आहे. त्यांचे पणजोबा १८८० मध्ये ब्रिटीश सरकारचे एक सर्व्हेअर म्हणून तिकडे गेले आणि तेथेच स्थायिक झाले. आजोबा भावनगरच्या राजांचे डॉक्टर व सर्जन होते आणि वडील सिव्हील इंजिनियर व भावनगर नगरपालिकेचे चीफ ऑफिसर होते.
वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मातोश्रींनी सर्व मुलांना मोठ्या हिंमतीने वाढविले व कार्यक्षम बनविले. मूळचे मेकॅनिकल इंजिनियर असलेले काणे यांनी Ph.D. होण्यापूर्वी Diploma in Industrial administration & Management, L.L.B. (International Law) ही केले होते. सुरुवातीस काही काळ ते CSMCRI भावनगर येथे सायंटिस्ट होते. त्यानंतर आपल्या विविध  क्षेत्रांतील प्राविण्यामुळे डॉ. काणे यांनी गुजराथ इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. मध्ये जनरल मॅनेजर, रिलयन्स इंडस्ट्रीज लि. मध्ये डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह, कॅलिको ग्रुप ऑफ कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर व चीफ एक्झिक्युटिव्ह, फिनोलेक्सचे प्रेसिडेंट व Essar ग्रुपचे डायरेक्टर अशी महत्वाची पदे भूषविली.  दरम्यान त्यांना NRDC National Award, S.S. Bhatnagar Research Endoment Award, The Award by the Federation of Gujarat Mills and Industries for “Research Conductive to the Betterment of the Society” for his Scientific Research अशी तीन अॅवार्डस मिळाली. आजवर देशातील आणि परदेशांतील जर्नल्समध्ये विविध विषयांवर त्यांचे अनेक पेपर्स प्रसिध्द झाले.  असून त्यांच्या नावावर चार इंडियन पेटंट्स पण आहेत. याशिवाय डॉ. काणे प्रभावी वक्ते आहेत व जगातील अनेक देशांत महत्वाच्या व्यासपीठांवरून त्यांनी भाषणे केली आहेत. 
पाण्याच्या थेंबासाठी आसुसलेल्या सौराष्ट्राचे नंदनवन करणाऱ्या ५ लाख हेक्टर जमिनीला शेतीसाठी पाणी, ९०० दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी, ५०० दशलक्ष पाणी औद्योगिक क्षेत्रांसाठी आणि धरण्याच्या भिंतीवरील जनित्राद्वारे समुद्राच्या भरती-ओहोटीपासून ५,८८० मेगावॉट वीजनिर्मिती असलेला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतीही मानवी वस्ती न बुडाल्याने पुनर्वसनाचा प्रश्न नसलेला असा ५० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या स्वप्नवत वाटणाऱ्या गुजराथच्या ‘कल्पसर’ या अति महत्वाकांक्षी प्रकल्पाचे  प्रणेते म्हणून डॉ. अनिल काणे ओळखले जातात. त्या प्रकल्पाच्या  ‘कोअर ग्रुप’ वरही त्यांची नियुक्ती झाली होती.
गुजराथ सरकार ‘विक्रम साराभाई’ यांच्या नावाने वैज्ञानिक संशोधनाबद्दल पुरस्कर देते, या पुरस्कराच्या चयन समितीचे डॉ. अनिल काणे सदस्य आहेत. याशिवाय गुजराथ सरकारच्या “Coastal Area Development Authority” च्या Board वर डॉ. काणे आहेत व त्याचाच प्रभाग असलेल्या “Coastal Area Tourism Development” चे ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर बऱ्याच नामांकित शिक्षणसंस्थांचे ते विश्वस्त व नियामक मंडळाचे सदस्य आहेत.
पुण्याच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या यादीत, तसेच गुजराथमधील ‘विद्याभास्कर’ वृत्तपत्राने प्रसिध्द केलेल्या १०० प्रभावी व्यक्तिमत्वांच्या यादीत देखील डॉ. काणे यांचा समावेश आहे. गुजराथ विश्वकोशात काणे मंडळींपैकी दोघांचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. बडोदेकरांनी ‘बडोदा भूषण’ म्हणून त्यांना गौरविले आहे. 
डॉ. काणे यांनी महाराज सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरूपद सप्टेंबर १९९८ ते सप्टेंबर २००१ या कालखंडात भूषविले. त्यांनी त्या काळात केलेल्या अनेक गोष्टी आजही वाखाणल्या जातात. महाराज सयाजीराव विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यावर ‘सुजलॉन’ कंपनीचे पूर्ण वेळ डायरेक्टर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्यानंतर डॉ. काणे यांची ‘इंडियन विंड एनर्जी असोसिएशन’ च्या चेअरमन अध्यक्षपदी निवड झाली.
आजही वयाच्या ७०व्या वर्षी ते एकाद्या तरुणाच्या उत्साहाने व उमेदीने कामात अखंड मग्न असतात आणि कामासाठी त्यांचे देश-विदेशांचे दौरे अव्याहत चालू आहेत. या सर्व व्यापातून मिळणाऱ्या फावल्या वेळात वाचन व शेती हे त्यांचे आवडीचे छंद जोपासतात. सुदृढ आरोग्यासाठी रोज एक तास पोहणे ह सर्वात चांगला व्यायाम आहे यावर त्यांचा विश्वास आहे. 
काणे कुलाला आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवून देणाऱ्या डॉ. अनिल काणे यांचा २००७ साली पुण्याच्या काणे संमेलनात काणे कुलप्रतिष्ठानचा भारतरत्न, महामहोपाध्याय डॉ. पां. वां. काणे पुरस्कार देऊन गौरव केला होता. डॉ. अनिल श्रीधर काणे ह्यांची डिसेंबर २०१० मध्ये ठाणे येथील काणे संमेलनात झालेल्या काणे कुलप्रतिष्ठानच्या सर्वसाधारण सभेत कै. वसंतराव काणे ह्यांच्या निधनानंतर ‘काणे कुलप्रतिष्ठानचे द्वितीय अध्यक्ष’ म्हणून एकमताने  निवड झाली. 
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar