वेलु गेला गगनावरी सॉलिसिटर हिमांशू वासुदेव काणे

कै. वा. सि. काणे या प्रख्यात वकिलांच्या घराण्यात हिमांशु वासुदेव काणे यांचा जन्म पुणे येथे १७ जुलै, १९५० रोजी झाला. नशिक येथील ‘भोसला मिलिटरी स्कूल’ येथून त्यांनी  मिलिटरी सायन्स’ या खास विषयात आपले शालेय शिक्षण पूर्ण केले पुढे रुपारेल कॉलेजमधून B.Sc. व गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून L.L.B. अशा दोन्ही पदव्या प्रथम श्रेणीमध्ये प्राप्त केल्या. त्यानंतर Bombay Incorporated Law Society च्या Solicitor परीक्षेत ‘प्रथम क्रमांक’ मिळवून सुवर्णपदकाचे मानकरी झाले.
पुढे वडिलांचे निवडलेल्या Intellectual Property Law मध्येच Practice करण्याचा निर्णय घेऊन Solicitor च्या Practice बरोबर ही सुरु केली. आज देशातील एक प्रतिथयश, नावाजलेले व यशस्वी वकील म्हणून त्यांची ख्याती आहे. W.S. Kane & CO. Solicitors, Associates, Advocates & Notary ही चर्चगेट येथील Firm भारतातील Intellectual Property Rights मधील काही अग्रगण्य Law Firm ची गणना जगातील ५०० IPR Law मध्ये केली गेली असून Asia Pacific Legal 500 Edition 2008 मध्ये “The Versatile Himanshu W. Kane is recommended for his in-depth knowledge and analysis and higher alertness and sharp mind असे नमूद केले आहे. Chamber Asia (Asian Leading Lawyer for Business) Client Guide 2009 मध्ये श्री. हिमांशू काणे यांचे “Mr. Himanshu Kane is respected for being extremely knowledgeable, approachable and well connected. A well reputed litigator” असे कौतुक केले आहे.
भारत सरकारतर्फे ‘पेटंट माहितीची व्यवस्था’ ह्या विषयावर खास अभ्यासासाठी त्यांना १९९४-९५ साली युरोपला पाठविले होते. अमेरिकेतील पेंटटच्या एका गुंतागुंतीच्या खटल्यामध्ये भारतीय पेंटट कायद्यावरील Expert म्हणून २००९ मध्ये साक्ष देण्यासाठीही त्यांना खास पाचारण करण्यात आले होते. अमेरिकेतील शिकागो येथे बायो टेक्नॉलॉजीवर २००६ साली झालेल्या सभेमध्ये ‘Does U S Patent Jurisprudence Force Outsourcing of Early Stage Drug Research to Non US Location’ सारख्या अवघड विषयावरील चर्चासत्रात भाग घेण्यासाठी त्यांची भारतातून निवड झाली. १९९५ साली आणि WIPO भारत सरकारतर्फे Patent Information System चा अभ्यास करण्यासाठी U.K.Patent Office आणि Vienna येथील EPC Patent ऑफिस ह्यासाठीही त्यांची निवड झाली होती. आपल्या मधीलच ‘काणे’ एक आडनावाशी बांधिलकी असणाऱ्याचे असे आंतराष्ट्रीय सन्मान होणे ही सर्वच काणे कुलाला मोठी अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. त्यांनी Intellectual Property Law मधील अनेक गुंतागुंतीच्या केसेस यशस्वीरीत्या चालविल्या आहेत. ह्या विषयावरील त्यांची भाषणे ऐकण्यासाठी चालविल्या आहेत. ह्या विषयावरील त्यांची भाषणे ऐकण्यासाठी मोठमोठ्या कंपनीमधील ज्येष्ठ अधिकारी व तरुण वकीलवर्ग सतत उत्सुक असतो. श्री. हिमांशू काणे यांची महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे Notary म्हणूनही नेमणूक झाली आहे. 
ते रहात असलेल्या लोकमान्य को. ऑप. हौ. सोसायटीचे सतत ३ वर्षे अध्यक्षही होते. सामाजिक जाणिवेमुळे, आपल्या व्यस्त व्यवसायातूनही मुद्दाम वेळ देऊन ‘Center for Study of Social Change’ ह्या संस्थेचे ते विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या W.S.Kane Humanist आणि नवजागृती समाज ह्या दोन्ही ट्रस्टतर्फे पारधी समाज, आदीवासी क्षेत्र, वेश्यांच्या मुलांचे पुर्नवसन, कर्णबधीर मुलांच्या खेडयातील शाळा इ. जनहितासाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करून आपल्या वडिलांच्या समाजकार्याची धुरा आपली पत्नी सौ. अनुराधा हिच्यासमवेत समर्थपणे सांभाळत आहेत. वाचन, संगीत ऐकणे आणि देश-विदेशांचे पर्यटन हे त्यांचे आवडते छंद आहेत. 
पत्नी सौ. अनुराधा हिमांशू काणे ह्या B.Com.,L.L.B. असून त्या Property Law मध्ये पतीसमवेत वकील करतात. श्री मानवेंद्र व आशुतोष हे दोन्ही चिरंजीवही उच्च विद्याविभूषित असून W. S. Kane & Co Solicitor Associates, Advocates & Notary  ह्या फर्ममध्ये वकीली  करतात. 
श्री. हिमांशू काणे आणि कुटुंबीय ह्यांच्या वकिली व्यवसायाशी संबंधित असलेल्या सहभागासाठी ‘महाराष्ट्र टाईम्स, मुंबई’ ने ‘ह्यांच्या घरात एकच कायदा’ ह्या सदराखाली काणे Family ची Family No.1 म्हणून शनिवार ६ मे २००६ च्या अंकात निवड केली होती. श्री.  हिमांशु काणे हे काणे कुलाला आंतराष्ट्रीय पातळीवर सन्मानित करणारे आणि एका वेगळ्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेले असे व्यक्तिमत्व आहे.
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar