आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती – |
Address
Murdi-Anjarle Khadipulmarge Kadyavaril Ganapati Mandir Marg, Anjarle, Maharashtra 415714Map
How to reach
It’s 3 k.m. from Rajapur village. State transportation buses are available from Rajapur to go to this spot. Visitors first get down at “Ushnodak Tirth” in Unhale village to take hot water bath and then walk half a mile towards Ganga which is on top of the hill. “Ushnodak Tirth” is a naturally formed hot water spring, located on Mumbai-Goa highway.By Road :
Mumbai to Anjarle(250 km):
Mumbai Panvel – Pen – Mangaon – Lonere Phata – Goregaon – Ambet – Shenale – Mandangad – Dapoli-Anjarle.
Pune to Anjarle:
There are three routes.
Pune to Anjarle via Tamhini Ghat(220 km): Pune – Chandani Chauk – Paud – Mulshi – Dongarwadi – Tamhini Ghat – Vile – Nijampur – Mangaon – Lonere Phata – Goregaon – Ambet – Mhapral – Shenale – Mandangad – Dapoli-Anjarle.
Pune to Anjarle via Mahabaleshwar(250 km):
Pune – Shirur Panchgani – Mahabaleshwar – Poladpur – Bharna Naka – Khed – Furus – Wakawali – Dapoli-Anjarle.
Pune to Anjarle via Bhor Ghat(200 km):
Pune – Khed Shivapur – Bhor – Varandha Ghat – Latwan – Dapoli-Anjarle.
Details
रत्नागिरी जिल्यात दापोली तालुक्यामध्ये समुद्राकाठी वसलेले आंजर्ले हे एक टुमदार गाव आहे. आंजर्ल्याच्या कड्यावरील श्री गणपती मंदिर प्रसिद्ध असून असून १२ व्या शतकात मंदिर निर्मिती समवे मंदिरा समोरील तलाव आणि मंदिराभोवातालाची तटबांधी यांची रचना पूर्ण झाली. मंदिराचे व्यवस्थापक रामकृष्णभट हरी नित्सुरे यांना स्वप्नधृष्टांत होऊन “या जीर्ण झालेल्या मंदिराचे जागी नवीन मंदिर बांध “ असा आदेश झाल्यवर त्यांनी दादाजी घाणेकर (पुणे) व रघुनात कृष्ण भट (धारवाड) यांचे आर्थिक सहाय्य घेऊन मूळ लाकडी व कौलारू मंदिराचे जागी जांभ्या दगडाचे कालाश्युक्ता मंदिर उभारले. हे काम सन १७६८ ते १७८० ह्या काळात झाले.
या पूर्वाभिमुख मंदिराची लांबी ५५ फूट व रुंदी ३९ फूट आहे. या मंदिराचे रचनेत प्राचीन भारतीय (वाकाटक कालीन , मध्ययुगीन रोमन (बैजनटाइन) आणि अर्वाचीन पाश्चात्य ( गोथिक) वैशिष्ट्यांचा कलात्मक सानाग्म केलेला आहे. सभागृहाला आठ कमानी तर गर्भागारलीही आठ कमानी आहे. या कमानी उभारण्याच्या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे या कमानींचे संपूर्ण वजन वरील घुमटासह भिंतीच्या पायावर परावर्तीत करतात. गर्भागारावरील पहिला घुमट आतल्या बाजूने ३५ फूट उंच असून गर्भागाराची आतली बाजू पूर्णपणे अष्टकोनी आहे. गच्चीवरील गर्भागारावरील अष्टकोनी रचनेच्या आधाराने दुसरा एक सुमारे १०-११ फूट उंचीचा आतून पोकळ घुमट उभारला असून या घुमटाचा बाह्य भाग नानाविध आकृतीबंधानी आणि वेलबुट्टीने परिवेष्टित असून १६ उपकलश आणि अष्टविनायकाच्या प्रतिमा यांनी नटलेला आहे मंदिराचे उंच पांढरेशुभ्र कळस दूर अंतरावरून ही दिसतात १७६८ ते १७८० या काळात या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला. दुसऱ्या जीर्णोद्धाराचे काम २१० वर्षांनी ३० नोव्हेंबर १९९० ते २४ फेब्रुवारी १९९६ या कालावधीत पूर्ण झाले. पूर्वापार या मंदिराचा कारभार नित्सुरे कुटुंबीयांकडे होता. २९ सेप्टेम्बर १९९६ रोजी, त्यांनी मंदिराचा कारभार ग्रामस्थ विश्वस्तांकडे हस्तांतरित केला.
या मंदिराचे वैशिष्ट्य महणजे या मंदिरात कोणत्याही जातीच्या गणेशभक्ताला स्वहस्ते श्रीपूजा करण्याचा अधिकार आहे यासाठी विश्वस्तांनी घटना दुरुस्ती केली आहे. तसेच हे मंदिर हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू आदी सर्वाधार्मियांसाठी खुले आहे.
येथे येण्यासाठी मुंबई-आंजर्ले-मंडणगड-कादिवली असा रस्ता आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली ही शहरे दापोलीला जोडली आहेत व दापोली-आसुदे-आंजर्ले असा दुसरा मार्ग आहे.
हरिहरेश्वर |
Address
Srivardhan, Near Bankot Fort,Map
How to reach
How to Reach Harihareshwar from Mumbai:In order to travel by road drive through Mumbai to Harihareshwar route that is 230km via Mumbai-Panvel -Mangaon-Goregaon Phat on Bombay-Goa highway.
The Mumbai – Pen – Kolad – Mangao – Morba – Harihareshwar route is the best route to reach Harihareshwar.
How to Reach Harihareshwar from Pune:
For traveling from Pune to Harihareshwar the best route is Pune- Mulshi – Tamhini Ghats – Mangao – Morba – Harihareshwar.
How to Reach Harihareshwar Beach By Train
Mangaon on the Konkan railway is the nearest railway station from Harihareshwar and located at a distance of 59km. trains from a number of major cities like Mumbai, Madgaon, Ernakulam, Bikaner and also Thiruvananthapuram halt at Mangaon and from Mangaon both buses and taxis are available to easily reach Harihareshwar.
How to Reach Harihareshwar Beach By Air
Mumbai International Airport at a distance of 210 km is the nearest international airport. Domestic flyers can also reach Pune by air and then travel to Harihareshwar by road. From Pune tourists can take the route via Chandni Chowk through Tamahini ghats or they can also travel through Bhor ghat and Mahad to reach Harihareshwar.
Details
पूर्वी नैमिषाख्यात शौनकारी ऋषींनी सुतला प्रश्न विचारला कि, "हे सूत, टॅप करण्यास योग्य व योग्याचे योग्य सिद्धीला योग्य योग्य असे तापाचे स्थान कोणते? तसेच जे क्लेश न होता पाप नाहीसे होते, जेथे सर्व देवता, सिद्धी साधने वसं करतात असे तीर्थ कोणते?" सूत सांगतात, "हाच प्रश्न पूर्वी दिलीप राजाने वसिष्ठ मुनींनी केला, तेव्हा मुनिश्रेष्ठ असे सांगतात की, हे राजा सर्व तीर्थमध्ये श्रेष्ठ असे हरहर नावाचे एक तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणे ब्रह्म, विष्णू, महेश, आदिमाया पार्वतीसह आहेत."
अशाच प्रकारचा प्रश्न गुरु दत्तात्रयांनी भार्गवरामांना केला होता. त्या वेळी पतितांना पावन करणारे क्षेत्र हरिहर असेच भार्गवरामाने सांगितले त्यामुळे गुरु दत्तात्रय यांनी तेथेच वास्तव्य केले.
सावित्री आणि गायत्री या दोनी नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून अरबी समुद्राला मिळण्याच्या ठिकाणी दोघींचा संगम होतो, त्या संगमावर श्री क्षेत्र हरिहरेश्वर वसलेले आहे. ब्रह्मदेवाच्या या दोनी स्त्रियांना पतिप्रियतेबाबतीतील,श्रेष्ठ, कनिष्ठतात्वाबद्दलच्या परस्परांच्या खोट्या कलहामुळे शापित होऊन नदीरूप प्राप्त झाले. त्यांचा जेथे सागराशी संगम होतो तेथे ब्रम्हा, विष्णू, महेश तिघेही पर्वतरूपाने वास करतात. त्यांच्या पायाशी सागरतीर्थावर सर्व लोपना पावन करणारे शुक्ल तीर्थ नावाचे ( हरिहरेश्वर ) गाव आहे. या ठिकाणी स्नानादी कृत्ये केल्यामुळे कलांकाच्या किंवा किल्मिषांच्या काळजीतून पूर्णपणे सुटका होऊन शुक्लतत्व म्हणजे पावित्र्य प्राप्त होते म्हणून या तीर्थला शुक्ल तीर्थ असे नाव मिळाले. या ठिकाणी पिशाच्यापासून मुक्ती मिळते, पाप व रोग यांचा क्षय होतो व निपुत्रिकांना संतान प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. येथे अगस्ती ऋषींनी तप केले होते.
श्री हरिहरेश्वराच्य पश्चिम दिशेला श्री कालभैरवाचे स्थान आहे. श्री क्षेत्र हरिहरेश्वराच्या दर्शना अगोदर श्री कालभैरवाचे दर्शन घ्यायचे ही प्रथा आहे. श्री हरिहरेश्वर तीर्थस्थानाला दक्षिण काशी असे ही संबोधतात. या ठिकाणी नाशिक क्षेत्राप्रमाणे, मरण पावलेल्यांची क्रियाकर्मे देखील करतात.
श्री हरिहरेश्वर हे तीर्थ पेशव्यांचे कुलदैवत आहे. सन १७२३ मध्ये श्रीमंत पेशव्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. याचा उल्लेख आज मितीस श्री कालभैरवाच्या प्रवेशद्वारावर आहे. तीर्थावरील प्रदक्षिणेसाठीच्या मूळच्या पायऱ्या जावळीचे सुभेदार चंद्राराव मोरे यांनी बांधल्या. शिवाजी महाराज येथे दर्शनास येत असत. महाराजांनी शेवटचे दर्शन सन १७६४ साली घेतल्याचा उल्लेख आहे
श्रीमंत पेशवे पोटदुखीने आजारी असताना देवाला नानासाहेब पुरंदरेव यांनी नवस बोलला होता. पुढे १७३३-३४ चे दरम्यान श्री कालभैरवास नवस बोला प्रमाणे मुखवटा अर्पण केल्याची नोंद बखरीमध्ये आहे. पेशव्यांनी सन १७३३ उत्सवाचे वेळी तोफावाजविण्याची आज्ञा केली होती. ४ एप्रिल १७७२ रोजी श्री हरिहरेश्वरचे दर्शन घेण्यासाठी श्रीमंत रमाबाई येऊन गेल्याची नोंद आहे. १८२७ पर्यंत या देवस्थानाचा सर्व खर्च श्रीमंत पेशवे करीत होते. पुढे इंग्रज सरकार करीत असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर २ मे १९५३ साली ट्रस्ट स्थापन करून त्याच्यामार्फत कारभार चालविला जातो.
Other Details
मंदिरातील धार्मिक उत्सव
कार्तिक उत्सव -
या उत्सवात एक महिना पालखी सोहळा असतो. रात्री ९ ते १० च्या दरम्यान श्री कालभैरवाची पालखी मंदिर परिसरात फिरविली जाते. नवान्न पौर्णिमा अश्विन शुद्ध १५ ते कार्तिक शुद्ध १५, त्रिपुरारी पौर्णिमा दरम्यान येथील मानकरी आपली सेवा श्री चरणी समर्पित करतात. याचवेळी कार्तिक शुद्ध १० ते १५ या शेवटचे दिवसात रात्री १० ते १२ पर्यंत कीर्तन सोहळा असतो.
श्री कालभैरव जयंती उत्सव -
कार्तिक वद्य अष्टमी श्री कालभैरवाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रात्री १२-४५ वाजता जन्मोत्सव होतो. हा उत्सव तीन दिवस साजरा करतात. नवमीचे दिवशी सर्व भाविकांना महा प्रसाद दिला जातो.
महाशिवरात्र -
माघ वद्य १३ व १४ व ३० असा तीन दिवसांचा हा उत्सव असतो. शिवरात्रीच्या दिवशी पर्वणी असल्याने मोठी जत्रा भरते. रात्री १० ते १२ या वेळात तीन दिवस कीर्तन सोहळा असतो.
चैत्र नवमी -
श्री हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये रामनवमीच्या दिवशी एकत्र जन्मोत्सव साजरा केला जातो. हा सोहळ गावकऱ्यांच्या सहभागातून साजरा केला जातो.
हरिहरेश्वर हे तीर्थ श्रीवर्धनपासून १६ किलोमीटर असून मुंबई-गोवा महामार्गावरून माणगाव येथून हे स्थान जवळ आहे.
योगेश्वरी |
Address
Mandi Bazaar, Ambajogai, Maharashtra 431517Map
How to reach
BY TRAINAmbajogai does not have an train station. Nearest option is Ghat Nandur.
Ambajogai
19 km away
Ghat Nandur (GTU), Nadur Ghat, Maharashtra
Ambajogai
20 km away
Parli Vaijnath (PRLI), Parli Vaijnath, Maharashtra
BY FLIGHT
There are no regular flights from other major cities of the country to Ambajogai. Nearest airport is Chikkalthana Airport.
Ambajogai
173 km away
Chikkalthana Airport (IXU), Aurangabad, Maharashtra
Ambajogai
266 km away
Lohegaon Airport (PNQ), Pune, Maharashtra
Details
प्राचीनकाळी गंटासूर नावाचा राक्षस जयंती नगरी येथे राज्य करीत होता. त्याच्या राजधानीचे ठिकाण जयंतीपासून १६-१७ किलोमीटरवर असणाऱ्या बर्दापूर येथे होते. तो महादेवाचा निस्सीम फक्त होता व त्याच्या कृपा प्रसादाने उन्मत्त झाला होता. तो ऋषीमुनींच्या होमहवन इत्यादी कार्यात अडथळे आणून त्यांना अतिशय त्रास देत असे. याच्यावर उपाय योजण्यासाठी सर्व देवांनी एकत्र येऊन आदिमाता जगदंबेची प्रार्थना केली. त्यावर प्रसन्न होऊन तिने दंतासुराची पारिपत्य करण्यासाठी जयंती नगरीत अवतार घेईन असे सर्व देवांना आश्वासन दिले. त्या प्रमाणे पुढे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेस आदिमाया योगेश्वरीच्या रूपाने जयंती नगरीत अवतार धारण केला आणि दंतासुराचा वध केला.
शहराच्या मधोमध वाहणाऱ्या जयंती नदीच्या पश्चिम तीरावर असलेले अंबेजोगाईचे अतिशय प्राचीन मंदिर हेमाडपंथी शिल्पकलेचा एक अत्यंत सुंदर नमुना आहे. मुख्य मंदिर उत्तराभिमुख त्या तसेच पूर्वाभिमुख महाद्वारासमोर एक अशा दोन भव्य दीपमाळा आहेत. त्रिपुरीपौर्णिमा व इतर उतसावाचे वेळी दोन्ही दीपमाळांवर दिव्यांची आरास केली जाते. मंदिरात दर्शनास जाताना दक्षिणाभिमुख महाद्वारातून जावे लागते. प्रवेश करताच मध्यभागी मुख्य मंदिराचे उंचच उंच असलेले पाचमजली भव्य शिखर दिसते पहिल्या मजल्यावर रामायण - महाभारतातील प्रसंगांची चित्रे आहेत. तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मजल्यावर अनुक्रमे, श्री योगेश्वरीच्या अवतरातील शिल्पे, श्री विष्णूच्या दशावतारातील शिल्पे, नवग्रह आणि सप्तर्षी आहेत. मोठमोठ्या दगडी खांबांवर आणि गर्भागाराचे चौकटीवर कोरलेले बारीक दगडी कोरीव काम प्रमाणबद्ध असून मनाची प्रसन्नता वाढविते. देवीचे दर्शन घेऊन उजवीकडे वळताच महाकाली व महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी ह्यांच्या मूर्तीचे दर्शन घडते. सभामंडपातून उत्तरद्वाराने बाहेर पडताच एक होमकुंड दिसते. उत्सव प्रसंगी येथे शतचंडी हवन असते. या मंदिरात श्री योगेश्वरीच्या द्वादशावतारातील श्री मातृरूप योगिनी- गणेशाचे एक वेगळे शिल्प आहे. या स्त्रीरूपातील गणेशमूर्तीला अठरा हाथ असून असा मातृस्वरूप गणेश अन्य कोठेही पाहावयास मिळत नाही.
Other Details
नैमित्तिक आराधना -
दर मंगळवारी व शुक्रवारी नगारखान्यात ५ वेळा चौघडा व सनईचे वादन होते. शुक्रवारी देवीच्या भोगमूर्तींचा छबीना गरुड अथवा सिंह ह्या वाहनावरून मंदिराच्या परिसरात निघतो. देवीची अलंकारिक पूजा, गुढीपाडवा, दिवाळी अशा महत्वाच्या सणांच्या दिवशी व अश्विन व मार्गशीर्ष महिन्याच्या उत्सव काळात होते.
श्री योगेश्वरी देवीचे वार्षिक उत्सव -
एक उत्सव अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवास सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी संपन्न होतो. दुसऱ्या उत्सवास मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीस घटस्थापना होऊन सुरुवात होते. एकादशी पासून अलंकार पूजा होते. पौर्णिमेच्या दिवशी शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती होते. मार्गशीर्ष पौर्णिमा हा देवीचा अवतार दिवस आहे.
काणे मारुती तळे चिंचवडी देवघर |
श्री परशुराम मंदिर, लोटे परशुराम |
Address
Parshuram, Dhamandevi Mohalla, Maharashtra 415605Map
How to reach
Accommodation : Hotels are available in chiplun.Getting There : One can avail MSRTC and private bus services to reach the attraction. Chiplun is easy to travel around in by foot. Auto rickshaws are also easily available.Very close from Chiplun railway station. On (Parshuram Ghat) Mumbai- Goa highway while travelling from Chiplun to Lote.
By Air : Mumbai is nearest airport.
By Rail : Very close from Chiplun railway station.
By Road : On (Parshuram Ghati) Mumbai- Goa highway while travelling from Chiplun to Lote.
Places to see nearby :
Malgund : Just a kilometer away from Ganapatipule, Malgund village is famous Marathi poet Keshavsoot?s birthplace.
Pawas : It is serene and naturally beautiful. The place is also prominent for the ashram of Swami Swarupanand. Jaigad Fort: The legendary fort stands high and proud on the cliff with a spectacular view of the sea. The fort is at the entrance of the Sangameshwar river and is 35 kms. away from Ganapatipule.
Marleshwar Temple and Waterfall : It is 60 kms. From Ganapatipule, famous for its Shiva temple and watrerfall.
Derwen : 85 kms. From Parshuram which is well known for its Shiv Shristi ( an exhibition on Chhhatrapati Shivaji. )
Jaygad Fort
Arevare Seaface and Beach
Details
Places to see nearby :
Malgund : Just a kilometer away from Ganapatipule, Malgund village is famous Marathi poet Keshavsoot’s birthplace.
Pawas : It is serene and naturally beautiful. The place is also prominent for the ashram of Swami Swarupanand. Jaigad Fort: The legendary fort stands high and proud on the cliff with a spectacular view of the sea. The fort is at the entrance of the Sangameshwar river and is 35 kms. away from Ganapatipule.
Marleshwar Temple and Waterfall : It is 60 kms. From Ganapatipule, famous for its Shiva temple and watrerfall.
Derwen : 85 kms. From Parshuram which is well known for its Shiv Shristi ( an exhibition on Chhhatrapati Shivaji. )
Jaygad Fort
Arevare Seaface and Beach
महालक्ष्मी |
Map
Details
दक्षिण कशी म्हणून कोल्हापूरची ओळाख आहे. प्राचीन काळापासून सुप्रसिद्ध असलेल्या करवीर नगरीमध्ये स्थित झालेली श्री देवी महालक्ष्मी हि तिरुपतीहून, वेन्कातेश्वारावर रुसून येथे येऊन राहिली अशी आह्ख्यायिका आहे. विस्तीर्ण अशा प्रांगणात, हेमाद्पान्ठी बांधणीचे हे प्राचीन मंदिर वास्तुशिल्पाचा एक सुंदर नमुना आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या चारी दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रमुख मंदिराच्या बाजूने अनेक देव्दावान्ताची मंदिरे या प्रांगणात आहेत. श्री महालक्ष्मीच्या समोर श्री महागणपती, मध्यभागी श्री महालक्ष्मी, डाव्या बाजूस महासारावती, उजव्या बाजूस महाकाली व बरोबर मध्यावर मातृलीन्गाची (शंकराची पिंडी) स्थापना केली आहे.
महालक्ष्मीची मूर्ती रात्नाशीलेची असून चतुर्भुज आहे. मंदिरांत रोज ५ वेळा आरती होते. सकाळी काकड आरतीचे वेळी मंदिर उघडले जाते. १२ वाजता महापूजा, अभिषेक व महानैवेध्य दाखवून पूजा बांधली जाते, त्यानंतर श्री देवी लक्ष्मीच्या अंगावर कोट्यावधी रुपयांचे दागिने चढविले जातात. रात्री १० वाजता शेजारती झाल्यावर दत्त मंदिराच्या पारावर तोफ उडविली जाते आणि पोशाख व दागिने उतरवून मंदिर बंद केले जाते. शेकडो वर्षांच्या रोजच्या पंचामृत पूजेमुळे मूर्तीची झीज झाल्यामुळे १९५४ साली पहिल्यांदा मूर्तीवर वज्रलेप करावा लागला. २००२ मध्ये पुन्हा एकदा वज्रलेप करण्यात आला.
मंदिराचा प्रमुख उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादाश्मिपर्यंत असतो. या काळात रोज देवीची नऊ दिवस वेगवेगळ्या पद्धतीच्या पोषाखाच्या रूपातील पूजा बांधण्यात येते. नवरात्रात पंचमीच्या दिवशी शीर देवी महालक्ष्मी पालखीत बसून श्री त्रमबुळी देवी (टेंबलाई) च्या भेटीस जाते व विजयादशमीच्या दिवशी, सीमोल्लंघन व शमीपूजनात भाग घेण्यासाठी देवी महालक्ष्मीची पालखी दसरा चौकात येते व मिरवणुकीने शहरातून नेली जाते. मंदिराच्या पश्चिमाभिमुख अशा वैशिष्ट्य पूर्ण बांधणीमुळे दरवर्षी कार्तिक व माघ महिन्यातील तीन दिवस मावळत्या सूर्याची किरणे मंदिरात २०० फूट आत येतात व देवीचे पदस्पर्श करतात.
ग्रामदेवता पालखी, केसपुरी |
Address
RATNAGIRI, MAHARASHTRA (MH), India (IN), Pin Code:- 415620ग्रामदैवत खेमराज मुरादे ता. खेड रत्नागिरी |
Address
Tal.Khed Ratnagiriग्रामदेवता, ग्रामवर्धनी |
Address
Murade Tal. KhedJilha Ratnagiri
श्री देव केदारनाथ मंदिर |
Address
Iani, Taluka Khed, Jilha Ratnagiriश्री विमलेश्वर |
Address
Murdi Tal. DapoliJilha Ratnagiri
श्री दत्तात्रय, गणेशवाडी |
Address
Taluka Shirol, Jilha Kolhapurश्री परशुराम |
Address
Teju, Arunachal PradeshDetails
Shree Parshuram temple or Somnath Parshuram Temple is one of the popular attractions nearby Somnath. This temple is located on the banks of Triveni Theerth at the spot where Lord Parshuram was relieved of the curse of ‘Kshatriyahatya’ with the blessings of Lord Somnath. The temple, dedicated to Lord Parshuram, also has two ancient Kunds in its premises.
Shree Parshuram temple has three main structures which are sabhamandap, a central mandap and a garbhagriha. The garbhagriha or the sanctum sanctorum has 3 idols with Lord Parasuram in the middle and Kala and Kama on both sides. The temple complex also consists of shrines dedicated to Lord Hanuman and Lord Ganesh. There is also a structure devoted to Lord Parasuram's mother Renuka, which is situated behind the Parasuram Temple.
माटलादेवी - |
Details
माटलादेवी ही सर्व काणे कुटुंबांची कुलदेवता मानतात. देवदिवाळीमध्ये सुद्धा देवाच्या नैवेद्यात ही हिला नैवेद्य दाखविला जातो. तथापी अनेकवेळा अनेक जणांनी या देवतेच्या मंदिराचा शोध घेण्याचा प्रयत्न करूनही या देवीचे मंदिर कोठेही आढळले नाही. याबाबत प्रामुख्याने दोन प्रवाद आढळतात. कोकणातील जि.रत्नागिरीजवळील मिऱ्या बंदराजवळील श्री भगवती देवीमध्ये ती तेजरूपाने विलीन झाली आहे. तसेच माहुरगडच्या श्री रेणुकामातेलाही माटलादेवी म्हणूनच ओळखले जाते.
"सर्व देव नमस्कारः केशव प्रतिगच्छती |" या न्यायाने आपण तिला कोणत्याही स्वरुपांत पाहून तिची आराधना करू शकतो!
नागावचा श्री बल्लाळ सिद्धिविनायक- |
Details
नागाव हे छोटे गाव रेगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात अलिबागपासून ४ किलोमीटर चैल रेवदंड्याच्या रस्त्यवर आहे. वेदमूर्ती श्री साने व श्री रिसबूड ही दोन विद्वान मंडळी काशियात्रेहून परतताना फिरत फिरत बडोदा मुक्कामी आली. तेथे बडोध्यातील प्रसिध्द श्रीमंत असामी श्री बल्लाळ म्हणजेच श्री गोपाळराव मैराल यांच्याकडे गजाननाच्या तीन उत्तम मूर्ती आहेत, असे कळल्यावरुन नागाव गावात खालच्या आळीमध्ये गणपती मंदिर असावे ही इच्छा प्रगट केली. मुळचे नागाव येथील असलेले श्री यादवराव आठवले यांच्या मध्यस्तीने श्रीमंत बल्लाळ यांनी या दोघांना एक उजव्या सोंडेची सुरेख मूर्ती व मंदिरासाठी रोख रु. २००/- दिले. श्री यादवराव आठवले यांनी नागाव येथील खालच्या आळीतील त्यांच्या राममंदिराचे जागेत – वाडीतच ह्या मंदिरासाठी जागा दिली. चैत्र शुद्ध पंचमीला शके १७६९ म्हणजे १८४७ साली छोट्याशा पेंढारु घरात या मूर्तीची स्थापना झाली. तेच हे ‘श्री बल्लाळ सिद्धिविनायक मंदिर’.
जेष्ठ शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी अखंड नामसप्ताह साजरा होतो. सप्ताहपूर्ती व अष्टमीला महाप्रसाद असतो. माघ चाथुर्तीला गणेश जन्मोत्सव कार्यक्रम प्रतीपदा ते पंचमी असा पाच दिवस असतो. तसेच रामनवमी जन्मोत्सव पण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.