कै. वसंत सदाशिव काणे |
काणे कुलप्रतिष्टानचे पहिले अध्यक्ष श्री. वसंत सदाशिव काणे
कै. वसंत सदाशिव काणे
काणे कुलप्रतिष्टानचे पहिले अध्यक्ष श्री. वसंत सदाशिव काणे यांचा जन्म १६ फेब्रुवारी, १९२० रोजी करमाळा, जि. सोलापूर येथे झाला. त्यांना पाच लहान भावंडे होती. वडील पोस्ट मास्तर होते. वसंतराव १४ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरची आत्यंतिक गरिबी असल्याने सुरुवातीस पडेल ते काम करून दिवस काढले. घरचा प्रपंच आणि धाकट्या भावांचे शिक्षण यासाठी रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्याचा जागी टेम्पररी म्हणून नोकऱ्या केल्या, शेतमजुरांवर देखरेखीसाठी शेतावरच्या झोपडीत राहून मुकादमाचे काम केले, गोळ्या, पेन्सिली, दुधाचे डबे विकणे यांसारखे छोटे छोटे व्यवसाय केले आणि को करत असताना स्वतःचे शिक्षण पूर्ण करत मॅट्रिक झाले. आर्थिक परिस्थितीमुळे मनात इच्छा असूनही कॉलेज शिक्षण मात्र घेता आले नाही. पुढे औरंगाबाद येथे काही महिने लष्करात नोकरी केली. पण घराकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने नगरला परत यावे लागले. परंतु वडिलांच्या पुण्याईने अहमदनगर डिस्ट्रिक्ट को.ऑप. बँकेत नोकरी मिळाली आणि काहीसे आर्थिक स्थैर्य आले. ११ जुलै, १९४३ ला पुणे येथील बॅरिस्टर गाडगीळ स्ट्रीटवर राहणाऱ्या कमल फडके यांच्याशी वसंतरावांचा विवाह झाला
वृत्तपत्रव्यवसायाची लहानपणापासून आवड असल्याने थोडी आर्थिक स्थिरता आल्यावर, धाडस करून १९४५ मध्ये अहमदनगर येथे "ज्वाला" हे साप्ताहिक वसंतरावांनी सुरु केले.
वृत्तपत्रव्यवसायाची लहानपणापासून आवड असल्याने थोडी आर्थिक स्थिरता आल्यावर, धाडस करून १९४५ मध्ये अहमदनगर येथे "ज्वाला" हे साप्ताहिक वसंतरावांनी सुरु केले.