कै. विद्यारत्न डॉ.सिद्धनाथ कृष्णाजी काणे |
प्रखर राष्ट्रभक्त व क्रांतिकारक
कै. सिद्धनाथ कृष्णाजी काणे यांचे वडील कृष्णाजी नारायण काणे हे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे या गावातून नोकरीचे शोधार्थ यवतमाळला आले. शिक्षकाची नोकरी करत असतानाच ते दारव्हा कोर्टामध्ये अर्जनवीस म्हणून काम करीत असत. आपल्या अंगभूत गुणांनी व सचोटीच्या व्यवहाराने उन्नती करीत सुमारे १५०० एकर जमिनीचे मालक झाले. अशा सधन कुटुंबात सिद्धनाथ कृष्णाजी काणे यांचा जन्म २ सप्टेंबर १८८७ रोजी यवतमाळ येथे झाला. सिद्धनाथांना एक वडील भाऊ व चार बहिणी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावतीस झाले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांचा संबंध अमरावतीच्या हनुमान व्यायाम मंडळाचे संस्थापक श्री. अंबादास पंत व लोकमान्य टिळकांच्या सुचनेनुसार तेथे आलेल्या भिडे भटजींबरोबर आला. तेथे ते कुस्ती, दांडपट्टा व भारतीय व्यायाम पद्धतीत प्रवीण झाले. या भिडे भटजींच्या प्रेरणेने सिद्धनाथांनी राष्ट्रभक्तीची व राष्ट्रासेवेची दिक्षा घेतली.
एकदा एक इंग्रजी शाळा परिक्षक शाळा तपासणीसाठी आला असताना ‘वंदे मातरम्’ अशी घोषणा सिद्धनाथांनी दिली. साहेबांनी याबद्दल माफी मागण्यास सांगितल्यावर त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांनी कालकत्त्याला जाऊन देशभक्त वातावरण असलेल्या संस्थेत प्रवेश घेतला व पुढे नॅशनल मेडीकल कॉलेजमधून एल्. एम्. अँड एस्. ची. वैद्यकीय पदवी घेऊन ते डॉक्टर झाले. कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, नागपूरचे डॉ. बुचे व पुण्याचे डॉ. पळसुले हे तरुण त्यांचे सहाध्यायी होते.
कलकत्त्यात असताना तेथील तरुण बंगाली क्रांतिकारकांशी त्यांचे अत्यंत घनिष्ट संबंध प्रस्थापित झाले होते. कलकत्त्याच्या ‘युगांतर’ या क्रांतिकारकांच्या संघटनेचे ते एक सक्रीय कार्यकर्ते होते. मुझफ्फरपूर येथील न्यायाधीश किंग्ज फोर्ड यांना बॉम्ब टाकून ठार मारण्याची योजना आखण्यात आली ती संपूर्ण योजना त्यांनीच केली होती व ती कामगिरी त्या बैठीकीत खुदिराम बोसवर सोपविण्यात आली. त्या घटनेनंतर खुदिराम बोसवर व बारिंद्र घोष यांना अटक करण्यात आली. सिद्धनाथ भूमिगत असल्याने याच कटातील एक आरोपी म्हणून त्यांचे ऐवजी यवतमाळचेच बाळकृष्ण हरी उर्फ आप्पा काणे यांना अटक करण्यात आली. श्री.बाळकृष्ण काणे यांनी, कलकत्ता येथील बॉम्बस्फोटात सिद्धनाथ काणे हे होते हे माहित असूनही, त्यांच्या नावाचा उल्लेखही आपल्या मुखातून केला नाही.
या कटात खुदिराम बोस आणि बारिंद्र घोष यांना फाशीची शिक्षा व श्री. बाळकृष्ण काणे यांना सात वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली होती त्यावेळी सुप्रसिद्ध कायदेपंडीत बॅरीस्टर श्री. चित्तरंजन दास हे श्री. बाळकृष्ण काणे यांचे सुटकेसाठी कोर्टात उभे राहिले व त्यांच्या अभूतपूर्व युक्तिवादाने जी फेरतपासणी आयडेंटी परेड घेण्यात आली त्यावेळी सरकारला बाळकृष्ण काणे यांचेबद्दल ‘माणिकतोला केसमधील काणे म्हणजे हेच काणे’ हे सिद्ध करता आले नाही व त्यांना या बॉम्ब केसमधून निर्दोष सोडण्यात आले. अशाप्रकारे सिद्धनाथ काणे दैववशात फार मोठ्या संकटातून वाचले.
कलकत्त्याहून वैद्यकीय शिक्षण केल्यावर डॉ. सिद्धनाथ काणे यांनी यवतमाळला वैद्यकीय व्यवसाय एक सेवाकार्य म्हणून सुरु केला. त्याचबरोबर टिळकांचा स्वराज्य पक्ष, यवतमाळ डिस्ट्रीक्ट असोसिएशन, चाईल्ड वेल्फअर सेंटर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु महासभा, अमरावतीचे हनुमान व्यायाम मंडळ अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून ते आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत कार्यरत होते. यवतमाळ डिस्ट्रीक्ट असोसिएशनचे व यवतमाळ नगरपालिकेचे अनुक्रमे उपाध्यक्ष व अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. वाई येथील चौंडे महाराजांच्या गोरक्षण कार्याचा विदर्भात खूप प्रसार केला व यवतमाळ गोरक्षण संस्था स्थापन केली. हैद्राबादच्या निजामाच्या रझाकार विरोधी प्रचंड मोर्चाचे नेतृत्वही त्यांनी केले होते.
याबरोबरच शारीरिक शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य आयुष्याभर व्रत म्हणून केले. अमरावतीच्या हनुमान व्यायाम मंडळाचे सुरुवातीच्या काळात ते उपाध्यक्ष होते व त्या सारखीच हनुमान आखाडा ही एक संस्था त्यांनी यवतमाळ येथे १९१७ साली स्थापन केली. इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीची शाखा म्हणून इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची स्थापना १९२० साली करण्यात आली. सर दोराबजी टाटा हे तिचे पहिले पेट्रन होते. डॉ. काणे मध्य प्रांत व वऱ्हाड ऑलिंपिक असोसिएशनचे सेक्रेटरी होते. १९१९, १९२५ व १९३२ अशा तीन वर्षी यवतमाळला मध्य प्रांत व वऱ्हाडचे ऑलिंपिक सामने त्यांनी आयोजित केले. डॉ. काणे यांच्या प्रयत्नाने १९२४ पासून हिंदुस्थानातील ऑलिंपिक सामन्यात लाठी, कुस्ती, मल्लखांब, लेझिम, दांडपट्टा इत्यादी हिंदी व्यायाम प्रकारांचा समावेश करण्यात आला.
१९३६, सालच्या बर्लिन ऑलिंपिक बरोबरच जागतिक व्यायाम परिषद भरविण्याचा निर्णय जर्मनीने घेतला. या जागतिक व्यायाम परिषेदला हनुमान व्यायाम मंडळाने आपला चमू डॉ. सिद्धनाथ काणे यांचे नेतृत्त्वाखाली पाठविला त्याच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी औंध संस्थानाचे भगवा ध्वज घेऊन हा चमू बर्लिनला पोहोचला. ऑलिंपिकमध्ये भारतीय व्यायाम पद्धतीचे प्रदर्शन केले. योगासनाचा व्यायाम, साधा व वेताचा मल्लखांब व गदगाफरी हे द्वंद यांचे सर्वत्र अतिशय कौतुक झाले. भारतीय व्यायाम पद्धतीचे यथोचित वर्णन, महत्व व महानता यासंबंधीच्या, तेथील तज्ञ मंडळींसमोर झालेल्या भाषणाचे अनुवाद सर्व जगभर प्रसिध्द झाले. बर्लिन ऑलिंपिक दरम्यान प्रखर राष्ट्रभक्तीचे व निर्भीड मनोवृत्तीचे दर्शन घडविणारा एक प्रसंग घडला.
बर्लिन ऑलिंपिक शेवटच्या दिवशी निरोप समारंभात प्रत्येक देशाने आपला राष्ट्रध्वज हातात धरून व्यासपीठासमोरून होणाऱ्या पथसंचालनात सामील व्हायचे होते. स्वत: हिटलर व गोबेल्स आदी नेते व्यासपीठावर हजार होते. ज्या राष्ट्राचा चमू व्यासपिठासामोर येईल त्या राष्ट्राचे राष्ट्रगीत वाजविले जाई. भारतीय चमू भगवा ध्वज घेऊन डॉ. सिद्धनाथ काणे यांचे नेतृत्त्वाखाली व्यासपीठासमोर येऊन पोहोचला. भारत ब्रिटीशांचा गुलाम असल्याने God Save the King हे गीत राष्ट्रगीत म्हणून वाजवण्यास सुरुवात झाली. भारताचा चमू जागेवरच थांबला. गोबेल्स यांनी डॉ. काणे यांना “आपण कां थांबलात?” अशी विचारणा केल्यावर हे आमचे राष्ट्रगीत नाही. आमचे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ असे सांगून स्वत: जवळील त्याचे रेकॉर्ड गोबेल्स यांनी दिली. ही रेकॉर्ड सुरु झाल्यावर भारतीय चमू मार्गक्रमण करू लागला. ब्रिटीश साम्राज्यशाहीच्या कळसाध्यायाच्या काळात अशा राष्ट्रीय बाण्याचे दर्शन हे केवळ अंर्तबाह्य राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्त्वातच असू शकते.
कार्यक्रमाचे शेवटी हिटलर यांनी गोबेल्स यांच्यासह डॉ. काणे यांना व्यासपीठवर सन्मानपूर्वक आमंत्रित करून स्वस्तिक आकाराचे ‘एक प्लॅटिनम मेडल’ स्वत: प्रदान करून गौरव केला. त्या स्वस्तिकावर खालील शब्द नमूद केले आहेत. Awarded to Dr. S.K. Kane. India-herr Hitler.
अशा या कर्तृत्ववान क्रांतिकारक व प्रखर राष्ट्रभक्ताचे १७ डिसेंबर १९५६ रोजी यवतमाळ येथे दु:खद निधन झाले. यवतमाळ जिह्यातील सर्व वृत्तपत्रांनी यवतमाळ जिह्यातील राजकीय,सामाजिक व शारीरिक क्षेत्रांतील ‘भीष्माचार्य’ निवर्तला अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
डॉ. सिद्धनाथ कृष्णाजी काणे यांना २००८ साली वाई येथे झालेल्या काणे संमेलनात, मरणोत्तर दिलेला, काणे कुलप्रतिष्ठचा भारतरत्न, महामहोपाध्याय डॉ. पां. व. काणे पुरस्कार ह खरेतर प्रतिष्ठानचाच गौरव होता.