कै. वसंत सीताराम काणे |
कै. वसंत सीताराम यांचा जन्म ४ मे, १९१६ रोजी भावनगर (गुजरात) येथे झाला. कराचीमध्ये B.E.CIVIL ची डीग्री प्राप्त केल्यावर काही वर्षे हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये अनुभव घेऊन, १९४६ साली स्वतःची ‘गोका इंजिनिअरिंग कंपनी’ स्थापना केली. त्यांचा विवाह पूवाश्रमीच्या कलावती गोगटे यांच्याशी झाल्यावर त्या सौ. सुधा काणे होऊन वसंतरावांच्या सहचारिणी झाल्या. त्यांना प्रिया प्रामोद काळे, प्रतिभा, अशोक भेंडे ह्या दोन मुली व प्रकाश अशी तीन अपत्ये आहेत. श्री. प्रकाशराव पुण्यातील एक प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक आहेत.
लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार असल्याने राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेने सामाजिक कार्यात त्यांच्या सतत सहभाग असे. १९४८ च्या संघबंदीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. संघाचे तत्कालिन सरसंघचालक श्री. गुरुजी यांच्या पुढाकारने १९६४ साली स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कामात कै. दादासाहेब आपटे यांच्या सान्निध्याने १९६६ साली वसंतरावांनी झोकून दिले. १९६६ साली त्यांनी, कै. बबनराव पेठेकर, कै. दीक्षित, कै. दादा चांदेकर, कै. अनंतराव आठल्ये, श्रीमती मोहनतारा पाटील ह्यांचेबरोबर पुण्यातील कामास सुरुवात केली. वसंतरावांनी लवकरच, विश्व हिंदू परिषदेच्या कामाचा प्रसार व प्रचार व्हावा व त्याचे स्वरूप समाजाला कळावे ह्यासाठी, उद्यान प्रसाद कार्यालयात दर गुरुवारी सुरु केलेल्या अनौपचारिक बैठकीस ७० ते ८० जण उपस्थित असत. हळूहळू कामाचा व्याप वाढत चालला व निधीची जरूर भासू लागली. यावर एक उपाय म्हणून वसंतरावांच्या अभिनव कल्पनेतून ‘घरोघरी दानपात्र’ ठेवण्याची योजना प्रत्यक्षात आली व तिला फार मोठा प्रतिसाद मिळाला. पुढे देशभर हीच योजना वि. हिं. प. ची अधिकृत निधी योजना म्हणून स्वीकारली गेली व आजही ती संपूर्ण भारतभर यशस्वीपणे सुरु आहे.
यानंतरच्या काळात वि. हिं. प. चा संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या विस्तारात त्यांचा मोलाचा वाट होता. पुण्यातील नातूबागेतील प्रांत कार्यालय उभारण्यासाठी निधी संकलनाचा मोठा भाग त्यांनी उचलाल होता. १९६७-६८ साली पंढरपूरच्या वाळवंटात झालेले महाराष्ट्र प्रांताचे पहिले विशाल संमेलन, तसेच संमेलनाच्या आर्थिक नियोजनासाठी निधी उभा करण्यात, प्रमुख संयोजक वसंतरावच होते, ही गोष्ट ते प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने फार थोड्या लोकांना माहित आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तीर्थक्षेत्रात वि. हिं. प. चे संमेलन झाले पाहिजे ही संकल्पनाही त्यांचीच. त्यामुळेच १९७४ साली श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे झालेल्या संमेलनाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. वडगाव मावळ येथील वनवासी मुलांच्या वसतीगृहाच्या उभारणी व आर्थिक नियोजानामागे वसंतरावांचे परिश्रम होते. यानंतर १९७९ ते १९८६ ह्या काळात वि. हिं. प. च्या महाराष्ट्र प्रांताची कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली व परिषदेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले. १९८६ सालच्या पू. बाळासाहेब देवरस व धुंडा महाराज देवलूगकर यांच्या उपस्थितीत झालेल्या आळंदीच्या महाराष्ट्र प्रांत संमेलनाच्या वेळीही ते प्रांत कोषाध्यक्ष होते. पुण्यातील नवसह्याद्री सोसायटीमध्ये ‘ज्ञानदा प्रतिष्ठानची’ शाळा सूर करण्यात वसंतरावाचा मोठा वाटा होता. कर्वे रोडवर, ब्रीजजवळ स्वातंत्र्यवीर बॅ. विनायक दामोदर सावरकर यांनी केलेल्या विदेशी कपड्यांच्या होळीचे मूळ ठिकाण वसंतरावांनीच पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिले, ज्याठिकाणी आज स्मारक उभे आहे.
१९८७ नंतर प्रकृती अस्वास्थामुळे प्रवास व दैनंदिन कामातील सहयोग अशक्य झाल्याने त्यांनी १९८८ ते २००१ या काळात एकता मासिक ट्रस्टच्या अध्यक्षपदीची जबाबदारी स्वीकारली.
विदेशातील हिंदू व हिंदू संस्कृती ह्या विषयावर वसंतरावांचा सखोल अभ्यास होता. त्यावर आधारित त्यांनी खालील पुस्तकांचे लेखन केले आहे :
1) अमेरिकेतील माया संस्कृती २) रशिया-कॉकेशस येथील बौद्ध संस्कृती ३) वेस्टर्न आर्यस्थान (Western Aryasthan) ह्या पुस्तकाचे लेखन करून त्यांच्या अनेक प्रती स्वत:च्या खर्चाने छापून भारतभर त्यांचे वितरण केले.
याशिवाय ‘दाभोळ येथील एरॉन प्रकल्पाचे संभाव्य धोके’ यावर प्रकाश टाकणारी एक अभ्यासपूर्ण पुस्तिकाही त्यांनी प्रकाशित केली होती. ५०-६० वर्षांपूर्वी, मित्रांच्या सहकार्याने, वेताळ टेकडीवर वृक्षारोपणाचे कार्य करून शेकडो झाडे लावण्याचे काम केले होते. या सर्व व्यापात गढलेले असूनही डेक्कन जिमखान्यावरील वैदिक प्रभात शाखेचे ते अखेरपर्यंत नियमित स्वयंसेवक होते. कामावरील निष्ठा कशी असावी याचा वसंतराव ह एक आदर्श वस्तुपाठ होते.
अशा हिंदू धर्म व हिंदू संस्कृती याचा अविरत ध्यास घेतलेल्या निष्काम कर्मयोगाच्या ७ नोव्हेंबर, २००३ रोजी दु:खद निधन झाले. वसंतरावांच्या निधानानंतर त्यांचे चिरंजीव श्री.प्रकाश वसंत काणे यांनी त्यांच्या स्मरणार्थ एकता मासिक संस्थेला एक लाख रुपयांचा देणगी ,श्रद्धांजलीच्या रूपाने अर्पण केली होती. वसंतरावांनी सुरु केलेल्या गोका इंजिनियरिंग कंपनीत आज त्यांचे चिरंजीव प्रकाश व अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन परत आलेला त्यांचा नातू अमोल अशी तिसरी पिढी कार्यरत आहे.
आम्हाला यांचा अभिमान आहे !
विमा, बँका आणि व्यापार या विषयाला वाहिलेल्या मराठीतील पहिले मासिक ‘विमा आणि व्यापार’ प्रकाशित करण्याचा मान मिळविणारे होते त्या मासिकाचे प्रवर्तक व संपादक ‘कै. पांडुरंग सीताराम काणे’ (मुर्डे घराणे १/१) !
कै. काणे हे दैनिक सकाळमध्ये नोकरी असत व कै. ना. भि. परूळेकर यांचे निकटचे सहकारी होते.
सप्टेंबर १९४७ साली ह्या मासिकाचा प्रथम अंक लिमयेवाडी, पुणे २ येथून प्रकाशित झाला ! त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीमुळे ते मासिक सप्टेंबर १९४७ ते ऑगस्ट १९५७ अशी केवळ १० वर्षे प्रकाशित झाले.
मार्च १९५७ मध्ये Life Insurance Corporation ते Centemery Commenotation Volume साठी LIC ने संदर्भ म्हणून ‘विमा आणि व्यापार’ चे सर्व अंक देण्याची कै. काणे यांना विनंती केली होती व ते सर्व अंक काणे यांनी विनामूल्य भेट म्हणून दिले.