दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त श्री. संजय बळवंत उर्फ भाऊ काणे |
महाराष्ट्र राज्याचा १९९२-९६ चा मानाच्या दादाजी कोंडदेव पुरस्कार सन्मानित श्री. संजय बळवंत काणे यांचा जन्म दि. १४ मे १९४९ रोजी झाला. १९७५ साली नागपूर विद्यापीठाने एम्. कॉम्. च्या परीक्षेत सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर त्यांनी १९८२ मध्ये सि.ए. व आय.आय.बी. ची पदवी प्राप्त केली. स्टेट बँक ऑफ इंडियातून झोनल ऑफिसर म्हणून निवृत्त झाले. १९७४ ते १९८८ या काळात वाणिज्य विषयाचे स्नातकोत्तर विद्यार्थी, सी.ए.तसेच बँकच्या आय.आय.बी. बँक अधिकारी यांना यशस्वी मार्गदर्शन केले.
पण श्री. भाऊ काणे यांच्या कार्याची खरी ओळख एवढ्याने होणार नाही. स्वत: एक खेळाडू असलेला भाऊंनी पुढे १९७३ पासून आपले पूर्ण योगदान खेळासाठी दिले. ते खोखो व मैदानी प्राविण्य असलेले प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत.
भाऊंचे क्रीडाक्षेत्रातील योगदान –
●१९७५ ते १९८६ या काळात शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ व राज्य स्तरावर अनेक कोचिंग कॅपसचे यशस्वी आयोजन.
●विदर्भाच्या मुलांच्या व मुलींच्या राज्य स्तरावरील खोखो टीमचे ३ वर्षे प्रशिक्षक.
●महाराष्ट्र राज्याच्या व मॅराथोन व क्रॉस संघाचे १९८६, १९८७ व १९९९ साली प्रशिक्षक
●नागपूर विद्यापीठच्या स्पोर्ट्स कौन्सिलचे १९९० ते १९९२ असे तीन वर्षे सदस्य.
ऑल इंडिया रेडिओ व दूरदर्शन यावर अनेकदा खेळावर व्याख्याने तसेच प्रसिद्ध वर्तमानपत्रातून लेख.
●फिजिकल एज्युकेशनच्या १५ पेक्षा जास्त विद्यार्थाना मास्टर्स डिग्रीसाठी मार्गदर्शन (गाईड)
१९८६ ते २००४ या काळात भाऊंनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटू घडविले आहेत. त्यांच्या ५ शिष्यांना महाराष्ट्राच्या ‘शिवछत्रपती पुरस्कारने’ गौरविले आहे, तर आजपर्यंत त्यांच्या ९ अॅथलेटिक्सनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या खेरीज राज्यापाताळीवर नैपुण्य दाखीवलेल्या त्यांच्या खेळाडूंची संख्या शेकड्यात मोजवी लागेल.
याबरोबरच त्यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग आहे. त्यांनी ५० पेक्षा अधिक वेळा रक्तदान आणि अनेक सोशल सर्विस कँप व ट्रि प्लँटेशन कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. अनेक व्यक्ती व धार्मिक संस्था तसेह देवस्थानच्या जीर्णोद्धाराकरिता प्रसिद्दीपासून दूर राहून मदत केली आहे.
श्री. संजय काणे यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामाची दाखल घेऊन महाराष्ट्र राज्यांने १९९२-१९९३ सालच्या ‘दादोजी कोंडदेव’ पुरस्काराणे सन्मानित केले आहे.
सध्या जबलपूर-मंडला या राज्य महामार्गावरील भाभल ग्रामी नर्मदा काठावर ते कर्तव्यपालनरत पीठाधीश आहेत.
अशा ह्या कर्मयोग्याचा २००७ साली पुणे येथील काणे संमेलनात काणे कुलप्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा, कै. दत्तात्रय चिंतामण काणे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.