कोळिसऱ्याचा लक्ष्मीकेशव |
Address
Kolisare, Maharashtra 415620MAP : Mumbai to Laxmi Keshav Mandir : Kolisare
MAP : Pune to Laxmi Keshav Mandir : Kolisare
MAP : PuneRatnagiri to Laxmi Keshav Mandir : Kolisare
Details
'लक्ष्मीकेशव ' हे अन्य काही घराण्यांप्रमाणे बहुतेक काणे कुटुंबियांचे कुलदैवत आहे. कोकणात रत्नागिरी-जयगड मार्ग वरील चाफे फाट्यापासून १२ कि.मी. अंतरावर उजव्या बाजूस कोळिसरे गावाचा रास्ता फुटतो. येथून २ कि.मी. अंतरावर उजवी कडे वळणाच्या रस्त्याने खाली उतरल्यावर डोंगराचे कुशीत समुद्रसपाटी पासून सुमारे १५०० फूट उंचीवर असूनही गर्द झाडी मध्ये असलेले ' श्री लक्ष्मीकेशव ' हे प्राचीन मंदिर रस्त्यावरून सहज दृष्टीस पडत नाही. एका बाजूस डोंगर, दोन बाजूस सपाट जमीन आणि चौथ्या बाजूला खोल दरी असलेल्या या ठिकाणी बाराही महिने वाहणारा थंड पाण्याचा निर्मळ झरा वाहतो. मंदिराला जाण्यासाठी दरीत उतरणारी मूळची दगडी पाखाडी (पायऱ्या) आहे आता मंदिर पर्यंत जाण्यासाठी रस्ता हि केला आहे. मन एकाग्रह करणारी निरव शांतता, सर्वकाळ हिरवीगार निर्जन अशी दाट झाडी आणि लक्ष्मीकेहवचा निकट सहवास असलेला हा परिसर आधुनिक काळातील एक तपोभूमी वाटावे असे रहस्य स्थान आहे. मंदिराच्या पश्चिमेला शास्त्री नदी किटी कोळिसरे हे एक लहानसे सुमारे ७०० ते ८०० लोक वस्तीचे खेडेगाव आहे.
लक्ष्मीकेशव नितळ व तेजस्वी चतुर्र्भूज प्रचित मूर्ती नेपाळमधील नदीतल्या काळसर तांबूस रंगाच्या शाळीग्राम शिळेतून घडविलेली असून शिल्पकलेच्या अप्रतिम नुमान आहे. सुमारे ५ फूट उंचीची मूर्ती अतिशय देखणी असून साळुंखेची उंची दीड फूट आहे. मूर्तीच्या उजव्या खालच्या हातात पद्म (कमल). वरच्या उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात गदा अशी आयुधे आहेत. हा पशंचग आयुधक्रम लक्षात घेता ही मूर्ती लक्ष्मीकेशवाची ठरते. विष्णूमूर्तीच्या हातातील या आयुधांच्या बदलत्या, कामानुसार त्या स्वरूपाची एकूण चोवीस नावे आहे. या मूर्तीवरील कलाकुसर अतिशय सुंदर असून प्रभावाळी वर दशावतार कोरलेले आहे. मस्तकी करंडक, मुकुट आणि अंगाखांद्यावर विविध अलंकार असलेल्या मूर्तीच्या उजव्या बाजूजस गरुड व जय आणि डावी कडे लक्ष्मी व विजय अश्या लहान पण रेखीव मूर्ती आहेत. लक्ष्मीकेशवाच्या मूर्तीस सन २००५ मध्ये वज्रलेप केला असून मंदिराचे नूतनीकरणही ६ नोव्हेंबर २००८ रोजी करण्यात आले आहे.
इ.स.७५० ते ९७३ या काळात विष्णूभक्त असलेले राष्ट्रकूट घराणे मराठवाड्यात राज्य करत होये यांचा अधिकार महाराष्ट्रयतही चालत होता. त्यांनी आपल्या काळात विष्णूच्या उत्तमोत्तम मूर्ती घडवून घेतल्या आणि त्यांची निरनिराळ्या ठिकाणी मंदिरे उभारून स्थापना केल. नंतर मुसलमानी अंमल सुरु झाला आणि मूर्ती भंग करण्याचा उद्योग त्या अंमलाने केले. अशावेळी मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ती मोठमोठ्या तलावांत बुडवून ठेवण्यात येत असावी. वरील मूर्ती पण रंकाळा तलावात (कोल्हापूर) अशीच बुडवून ठेवली असावी. वरवडे भागातील जोशी, विचारे व काणे घराण्यातील पुरुषांचे स्वप्नांत, मी रंकाळा येथे आहे, शोध घ्यावा असा दृष्टांत झाला. स्वप्न-दृष्टांतप्रमाणे त्यांनी शोध घेतला असता ती मूर्ती रंकाळा येथे मिळाली. मूर्तीचा पेटारा रस्त्याने व जलमार्गाने केशवपुरी (केसपुरी) येथे आणताना कोळीसरे गावात विश्रांतीसाठी ठेवण्यात आला. विश्रांतीनंतर पेटारा उचलला जाईना, त्यावरून देवास येथेच राहण्याची इच्छा आहे असे समजून इ.स. १५१० च्या सुमारास तेथेच तिची स्थापना झाली.
देवस्थानाचा वार्षिक उत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा असा सहा दिवस तेरेदेसाई ग्रामस्थांतर्फे केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात एक दिवस बारा तासांचा भजनाचा कार्यक्रम वरवडे ग्रामस्थ व कुलपासक करतात. या देवस्थानच्या व्यवस्थापनेसाठी 'श्री लक्ष्मी देवस्थान विश्वस्त मंडळ ' कार्यरत आहे. देवस्थानचे पुजारी म्हणून वंशपरंपरेने श्री सुधीर भार्गव मराठे, डोके पाहत असून त्यांचा दूरध्वनी क्र. (०२३५७) २४३६३५ असा आहे.