कै. माधव रामचंद्र काणे |
जन्म : १७ डिसेंबर, १९२७
मृत्यू : ३० ऑक्टोबर, १९९५
काण्यांच्या पाळण्यांत
तान्ह्या बाळाच्या कानांत
आईने नाव फुंकले बिंदूमाधव
पण बाळाचे पाय पाळण्यातच चळवळ करू लागले
मातापित्यांनी, आप्तांनी हे हेरले आणि
बिंदू पुसून टाकला.
उरलेल्या माधवने सागराची व्याप्ती आणि
अथांग खोली जीवनात गाठली.
संघ सत्याग्रह, गोमंतक मुक्ती संघर्ष,
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनांत स्वतःला झोकून दिले
मग्रूर पोर्तुगीज सैनिकांची गोळी ह्या अहिंसक
सत्याग्रहीने दंडात झेलली.
ह मरणाग्रह आहे असे वास्तव सांगत माधव
लोकशाही मार्गाने काम करू लागला.
ऐन तरुणपणी नगरसेवक झाला.
सर्वपक्षीय पाठींब्यावर नगराध्यक्ष झाला,
आणि पुढल्याच वर्षी सर्व राजकीय मोह दूर सारून
वनवासींच्या सेवेला तलासरीत स्थिर झाला.
जंगलात मंगल केले
अल्पावाधीतच तेथे तपोवन झाले.
माधव काणेंच्या ओटीवर जमणाऱ्या सळसळत्या
रक्ताच्या तरुणांच्या चर्चा झाडत, बेत होत, बंडखोर
पासून विधायकतेपर्यंत कार्यांची स्वप्ने उभी रहात.
काण्यांच्या ओटीवरच्या भिंती आणि खांबांनी
ते सर्व ऐकले आहे.
त्याचं हे शब्दरूप, ही शब्द सुमने
माधवरावांच्या
स्मृतीस अर्पण