चित्पावन ज्ञातीची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यात कुलवृत्तांत प्रसिद्धी हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. काणे घराण्याला खूप जुना इतिहास आहे. काणे बांधव हे विविध शास्त्रात विद्वान व विद्यात पारंगत होते व आजही आहेत.
या दृष्टीने काणे घराण्यातील कुटुंबा-कुटुंबातून आपलेपणाची, जिव्हाळ्याची भावना वाढीस लागावी या हेतूने १९५५-६० च्या दरम्यान दादरच्या मामा काणे उपहारगृहाचे मालक कै. शंकर नारायण काणे, पुण्याच्या रोहिणी मासिकाचे संपादक कै. वसंत सदाशिव काणे, ह.भ.प. मधुसूदन केशव काणे, डोंबिवली आणि कै. रामकृष्ण काशिनाथ काणे यांनी 'कुलदीपक संग्रह' तयार करण्याचे काम सुरु केले होते. तथापि त्यावेळेच्या सामाजिक, परिस्थितीमुळे व दळणवळणाच्या आणि एकमेकांशी संवाद साधण्याच्या सोयींच्या कमतरतेमुळे त्याला अपेक्षित यश येऊ शकले नाही.